नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एक धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील दुगाव याठिकाणी घडली आहे. जमीन व्यावसायिक राजू शिंदे यांच्यवर चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील दुगाव येथील जमीन व्यावसायिक राजू शिंदे (वय ४५) यांच्या छाती, मांडी, मानेवर चाकूने वार करण्यात आले. चाकूने वार केल्यानंतर शिंदे हे जमिनीवर कोसळले. घटनेत गंभीर जखमी शिंदे यांना सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित केले. राजू शिंदे हे नावाजलेले व्यावसायिक होते. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
शिंदे यांच्यावर चाकूने वार केल्यानंतर संबंधित व्यक्ती पसार झाला. हत्या करणाऱ्या संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले असून पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. चांदवड पोलीस स्थानकात विविध कलमान्वये १० व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.