जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अनेक भागात तुफान वाळू वाहतूक सुरु असल्याने एका ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. यात एरंडोलचे प्रांताधिकारी मनीष गायकवाड यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पाचोरा येथील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यात आकाश राजेंद्र पाटील (२६), अमोल अरुण चौधरी (३२) आणि दादाभाऊ महादू गाडेकर (३०, सर्व रा. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्राण येथील नदीपात्रात शुक्रवार दि. १२ रोजी रात्री एरंडोल प्रांत मनीष गायकवाड यांच्यासह महसूल पथकावर वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर सर्व गुन्हेगार फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने यापैकी तीन आरोपींना मंगळवारी पाचोरा येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना लागलीच कासोदा येथे आणण्यात आले. या तीनही जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कासोदा पोलिस ठाण्यात लॉकअपची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना एरंडोल पोलिस ठाण्यात रवाना करण्यात आले आहे. त्यांना बुधवारी एरंडोल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.