प्रतिनिधी लक्ष्मण पाटील येथील जीपीएस कॅम्पस च्या विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून पोलीस स्टेशन ही संकल्पना समजून घेतली. कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे.
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पस पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल तसेच भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून पोलीस स्टेशन ही संकल्पना समजून घेतली.
कृतीयुक्त शिक्षण देणारी शाळा म्हणून अल्पावधीत जीपीएस ला नावलौकिक प्राप्त झाले आहे. दि 18 रोजी प्राचार्यांच्या कृतीयुक्त शिक्षण ह्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट दिली, प्रसंगी पाळधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेशजी बुवा यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सर्व पोलीस बांधवांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
पोलीस प्रशासनातर्फे क्षेत्रभेटीची परवानगी देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासन व त्याच्या कारभाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कृतीयुक्त शिक्षणातून संकल्पना प्राप्ती या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. सदर क्षेत्र भेटीप्रसंगी भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य सचिन पाटील ,भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य . डी. डी. कंखरे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
पोलीस हा समाजाचा खरा रक्षक असतो, नाविन्यपूर्ण शिक्षणातूनच आदर्शवादी, शिस्तप्रिय, आणि सामाजिक जाणीवांचे भान असणारा विद्यार्थी तयार होतो असे प्रतिपादन एपीआय गणेशजी बुवा यांनी व्यक्त केले.
शाळा प्रशासनाच्या वतीने प्राचार्य सचिन पाटील यांनी क्षेत्र भेटीची परवानगी देऊन विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व पोलीस बांधवांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली,सूत्रसंचालन . भूषण पाटील यांनी केले.