मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुलीसह विवाहितेचा विनयभंगाच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच कुर्ला रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने दुसऱ्या महिलेवर विनयभंगाचा आरोप केला आहे. शुक्रवारी ट्रेनने प्रवास करताना ही घटना घडली आहे.
शुक्रवारी धावत्या ट्रेनमध्ये एक महिला आणि महिला फेरीवाल्यांमध्ये भांडणे झाली. यात त्या दोघींची हाणामारीदेखील झाली. ट्रेनमधील प्रवाशांनी त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. धावत्या ट्रेनमध्ये या दोघींमधील भांडणे वाढली. यात एका महिलेच्या कुर्त्याची बटणे तोडली. त्यामुळे वाद आणखीच चिघळला. त्यानंतर हे प्रकरण कुर्ला जीआरपीपर्यंत गेले. याप्रकरणी महिलेने कुर्ला जीआरपीमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी महिला फेरीवाल्याला नोटीस बजावली आहे. अजून फेरीवाल्या महिलेला अटक करण्यात आली नाही. तर उलट फेरीवाल्या महिलेनेच प्रवासी महिलेविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.