Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोटच्या मुलाने बापाची केली निर्घृण हत्या
    क्राईम

    पोटच्या मुलाने बापाची केली निर्घृण हत्या

    editor deskBy editor deskJanuary 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका तरुण पोलिसाच्या खुनाची बातमी ताजी असतांना यावल तालुक्यात देखील एका बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माझे लग्न करून द्या अशी मागणी करत करत असलेल्या वृद्ध वडिलांना स्वतःच्या मुलाने रागात येउन कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्न तानसिंग कोळी (वय-७३ रा. पिळोदा ता. यावल) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील पिळोदा येथे रतन कोळी व त्याची पत्नी शुबाबाई कोळी आणि मुलगा देवानंद कोळी यांच्यासोबत वास्तव्यास असून ते नेहमीप्रमाणे रविवारी १४ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास झोपलेले असतांना, मुलगा देवानंद कोळी याने माझे लग्न लावून द्या म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले असता, याचा राग डोक्यात घालत आरोपीने झोपलेल्या वृद्ध पित्यावर कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेने गावात खळबळ उडाली. यावेळी पतीचा खून झालेला पांगून पत्नी शुबाबाई यांनी एकाच आक्रोश केला. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपी देवानंद कोळी याला अटक करण्यात आली.

    रतन कोळी यांचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शबाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा देवानंद कोळी याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिळोदा गावात घटनास्थळी फैजपुरच्या डीवायएसपी अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर व यावल पोलीस पथकाने भेट दिली, पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.