अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील १२ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना दि.२२ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरण संशयित हसन खॉ अमीर खा बेलदार (वय ६५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील एका परिसरात १२ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन बालिका परिवारासह वास्तव्यास असून ती गल्लीत खेळत असताना संशयिताने २२ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता एका रीक्षेत नेत तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडीतेच्या आजोबांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यावरून पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.