लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शेतातील विजेच्या डीपीवर काम करताना उच्च दाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने पंचवीस फुटांवरून खाली पडलेल्या तरुणावर येथील शिरसोली रस्त्यावरील देवकर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेशिवाय यशस्वी उपचार करण्यात आले. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर या रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी नातेवाईकांनी येथील डॉक्टरांच्या टीमचे तोंड भरून कौतुक केले.
निंभोरा ता. (धरणगाव) येथील रहिवासी असलेले विलास पुंडलिक बोरसे (वय 48) हे मका लागवडीसाठी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांच्या कृषी पंपाला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मर वरून वीज गेली. त्यामुळे विलास बोरसे हे ट्रांसफार्मरवर काम करण्यासाठी चढले. मात्र अनवधानाने त्यांचा हाताचा स्पर्श ट्रांसफार्मरवर असलेल्या उच्चदाब क्षमतेच्या तारांना लागला आणि ते पंचवीस फूट खाली जमिनीवर फेकले गेले. खाली पडताच त्यांना स्वतः उठणे शक्य झाले नाही. कारण त्यांचे पाठीचे मणके, बरगड्या व खांद्याला जबर मार लागला होता. तशा अवस्थेत त्यांना जळगाव शहरातील इतर रुग्णालयात नातेवाइकांनी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर विलास बोरसे यांच्या नातेवाईकांनी देवकर हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि दोन डिसेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. त्
यांच्या सर्व तपासण्या केल्यानंतर येथील डॉक्टरांनी मणके, बरगळ्या आणि खांद्याच्या फॅक्चरवर शस्त्रक्रिया न करता उपचार करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच यांना ऑक्सिजनची गरज असल्याने येथील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा वार्डात हलवण्यात आले. त्यानंतर न्यूरोसर्जन डॉ. प्रशांत साठे, आर्थोपेडिक सर्जन डॉ. अभिजीत पाटील, आई सी यु तज्ञ डॉ. प्रियांका पाटील, डॉ. स्नेहल गिरी यांच्या टीमने पंधरा दिवस यशस्वी उपचार करून शस्त्रक्रियापासून रुग्णाची सुटका केली. दरम्यानच्या काळात येथील फिजिओथेरपिस्ट डॉ. अमित नेमाडे यांनी उपचार करून त्यांना अंथरूणावर उठून चालते केले. या उपचारानंतर त्यांना 17 डिसेंबर रोजी घरी सोडण्यात आले. मात्र मणके व बरगड्यांना फॅक्चर असल्याने त्यांना तीन महिने पूर्णपणे बेडरेस्टचा सल्ला देण्यात आला. उपचाराच्या सर्व प्रक्रियेदरम्यान समन्वयाचे काम हॉस्पिटलचे ऍडमिनिस्ट्रेटर डॉ. नितीन पाटील यांनी केले.