• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन मुले झाली पोरकी : पत्नीनंतर पतीने संपविले आयुष्य !

editor desk by editor desk
January 13, 2024
in क्राईम, जळगाव, बोदवड
0
दोन मुले झाली पोरकी : पत्नीनंतर पतीने संपविले आयुष्य !

बोदवड : प्रतिनिधी

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही आत्महत्या केल्याची घटना बोदवड तालुक्यात साळशिंगी येथे घडली. या घटनेमुळे दोन मुले पोरकी झाली आहेत. या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील साळशिंगी येथील हरतालिका विनोद महाजन (वय ४०) या महिलेने काही ही कारणामुळे चार-पाच दिवसांपूर्वी विष घेतले होते. तिच्यावर जळगाव येथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान रविवारी ७ रोजी तिचा मृत्यू झाला. सोमवारी या महिलेचे तिसरे होते. हा कार्यक्रम झाल्यावर या महिलेचा पती विनोद सुभाष महाजन (वय ४५) हा घरी कोणास काहीही न सांगता निघून गेला. यानंतर त्याचा तपास लागला नाही. दरम्यान, शुक्रवारी १२ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तालुक्यातील सोनोटी शिवारात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले असून एक मुलगा १४ वर्षांचा, तर मुलगी १२ वर्षांची आहे. या घटनेने गाव सुन्न झाले आहे. याप्रकरणी विनोदचा मोठा भाऊ सुनील महाजन यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास आयुब तडवी करीत आहेत.

Previous Post

बापरे : १०० फुट विहिरीत पडलेल्या इसमाला पोलिसांनी जिवंत काढले बाहेर !

Next Post

शेत शिवारातून केबल चोरीला !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

शेत शिवारातून केबल चोरीला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group