जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील एका १०० फुट विहिरीत पुरुष पडल्याचे काही नागरिकांनी शनी पेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत रेस्क्यु पथक तयार करून विहिरीत पडलेल्या इसमाला जिवंत बाहेर काढल्याने परिसरात पोलीस यंत्रणेचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जुना खेडी रोड ज्ञानदेव नगर 100 फुटी रोड जवळ एक पुरूष विहीरीत पडल्याची घटना दिनांक ११ जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे फोनव्दारे नागरिकांनी कळविले होते. याबाबत शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी तात्काळ एक रेस्क्यु पथक तयार करुन त्यात पोउपनि श्री योगेश ढिकले, मुबारक तडवी, सफौ इद्रिस पठाण, पोहेका विजय खैरे, पो.कॉ मुकुंद गंगावणे, नवजीत चौधरी अशांना मार्गदर्शन करुन तात्काळ घटनास्थळी केले.
सदर पथकाने अग्निशामक दलाला बोलावुन तसेच नागरीक जितेंद्र पाटील यांच्या सहाय्याने मोठ्या शिताफिने 70 ते 80 फूट खोल विहीरीतील पाण्यात पडलेल्या इसमास जिवंत सुखरुपणे बाहेर काढुन प्राण वाचविले सदर इसमास पोलीस ठाण्यात आणुन त्याचे नाव गांव बाबत विचारपुस करता तो थोडा मानसिक मनोरुग्ण असल्याचे समल्याने त्यास पथकाने जेवण देवुन पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने एक मोबाईल क्र आठवून सांगुन तो वाराणसी येथे लागल्याने सदर मोबाईल क्रमांक हा त्याच्या वडिलांचा असल्याबाबत समजल्याने त्यांचे नाव रवि राजेंद्र यादव रा. वाराणसी येथील असल्याचे समजले व सदरचा इसम हा 4 दिवसांपासुन हरविल्याबाबत सांगितल्याने सदर इसमाच्या वडीलांना शनिपेठ पोलीस स्टेशन येथे बोलावुन त्यांचा हरवलेला मुलगा त्यांच्या ताब्यात दिल्याने राजेंद्र यादव व त्यांचे नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक श्री रंगनाथ धारबळे व संपूर्ण रेस्क्यु पथकाचे मनापासुन आभार मानले आहे.