नाशिक : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन झालं. यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले कि, भारत लोकशाहीची जननी असून यात तरुणांच मोठं योगदान आहे. देशातील तरुण तरुणींनी यापुढेही लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे घराणेशाहीला लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे. या प्रक्रियेत तरुणांचा जेवढा सहभाग जास्त असले तितकं देशाचं भविष्य उज्ज्वल असेल. देशाचं भविष्य असलेल्या या तरुण पिढीने येणाऱ्या काळात ही जबाबदारी स्वीकारावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेतून युवा पिढीला केलं. नाशिकमध्ये आयोजित युवा महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी तरुणांना आणि देशातील जनतेला संबोधित केलं.