लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह वीस सावदा येथील नगराध्यक्ष व इतर कार्यकर्ते यांनी नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे भुसावळ सावदा पळसपुर या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भुसावळ नगरपरिषद चे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण गोडे यांनी आज नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर या सोबत भाजपाचे वीस नगरसेवकांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भुसावळ मध्ये भाजपाला मोठे खिंडार पडले आहे तर याच बरोबर सावदा येथील नगराध्यक्ष अनीता येवले फैजपूर येथील नगरसेवक कार्यकर्ते जामनेर येथील कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपला मोठा धक्का दिला आहे या वेळी व्यासपीठावर एकनाथराव खडसे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील आमदार अनिल भाईदास पाटील माजी आमदार संतोष चौधरी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर माजी आमदार सतीश अण्णा पाटील अरुण भाई गुजराती मान्यवर उपस्थित होते.