Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आई शब्दाला काळिमा : चार वर्षीय मुलाचा केला खून !
    क्राईम

    आई शब्दाला काळिमा : चार वर्षीय मुलाचा केला खून !

    editor deskBy editor deskJanuary 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बंगळुरू : वृत्तसंस्था

    शहरातील एका एआय कंपनीच्या सीईओ महिलेने आपल्या केवळ चार वर्षीय मुलाच्या हत्येचा कट रचला होता. या कटाचा भाग म्हणून ३९ वर्षीय सूचना मुलाला घेऊन गोव्याला आली आणि तिथे हॉटेलच्या खोलीत त्याचा खून केला, असा संशय असल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले.

    गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीतून कफ सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हत्येपूर्वी सूचनाने आपल्या मुलाला कफ सिरपचा हेवी डोस दिला असावा, असा पोलिसांना संशय आहे. सूचनाने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून कफ सिरपची बाटली मागवली होती. त्याला खोकला असल्याचे सूचनाने सांगितले होते.

    मुलाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे. कर्नाटकातील हिरीयुर सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर कुमार नाईक यांनी सांगितले की, मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. उशी किंवा टॉवेलने गळा दाबल्यासारखे वाटते. हाताचा वापर केला नाही. मुलाचा चेहरा आणि छाती सुजली होती. त्याच्या नाकातूनही रक्त वाहत होते. पोस्टमॉर्टमच्या ३६ तास आधी मुलाचा मृत्यू झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    छत्रपती संभाजीनगरात भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या !

    October 22, 2026

    धरणगावातील जबरी चोरी प्रकरणाला वेग; दोन फरार आरोपींना जळगाव एलसीबीने पकडले

    October 22, 2026

    बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या : घुग्घुस आंदोलनाप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

    October 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.