Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेमसंबंध असल्याचा संशय : प्रियकराने बँकेच्या मॅनेजर प्रेयसीला संपविले !
    क्राईम

    प्रेमसंबंध असल्याचा संशय : प्रियकराने बँकेच्या मॅनेजर प्रेयसीला संपविले !

    editor deskBy editor deskJanuary 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणातून अनेक हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील तुर्भे येथून समोर आली आहे. महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या प्रियकराला होता. यातूनत त्याने तिची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. अमित रवींद्र कौर ( वय 35)असं मृत महिलेचं नाव आहे. मृत महिला एका खासगी बँकेच्या मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. तर शोएब शेख (24) असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. दोघांची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. अमित कौरचा काहीच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर दोघे सप्टेंबर २०२३ पासून एकमेकांना डेट करत होते.

    शोएब आणि अमित यांच्या प्रेससंबध असले तरी शोएबच्या डोक्यात भलतच काहीतरी सुरु होती. अमितचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय शोएबला होता. अमित आपल्याला फसवत आहे, असा संशय शोएबला होता. यातून शोएबने अमितला संपवण्याचा निर्णय घेतला.

    ८ जानेवारी रोजी अमितचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त दोघांना भेटायचं ठरवलं होत. शोएबने आधी अमितच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर दोघांना तुर्भे येथील लॉजमध्ये एक रुम बूक केला. रुममध्ये शोएब आणि अमितमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यानंतर शोएबने अमितचा गळा आवळून तिची हत्या केली. मध्यरात्रीच शोएब लॉजमधून बाहेर पडला, तेथील कर्मचाऱ्यांनी देखील त्याला पाहिले. मात्र त्यांना फारसा संशय आला नाही.

    मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांनी खोली उघडली तेव्हाच त्यांना अमित कौरचा मृतदेह खोलीत आढळून आला. लॉजमधून बाहेर पडल्यानंतर शेख त्याच्या साकीनाका येथील घरी परतला होता. साकीनाका पोलिसांना त्याला घरातून अटक केली असून त्याला तुर्भे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आरोपी शोएब शेख विरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.