नाशिक : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे क्रिकेट खेळत असताना २९ वर्षीय तरुणाच्या छातीत कळ येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. यात महेश पांडुरंग बर्डे (वय २९) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
मंगळवारी सायंकाळी गावाजवळच्या मैदानात महेश व त्यांचे काही मित्र क्रिकेट खेळत होते. मात्र, अचानक महेशच्या छातीत दुखू लागल्याने मित्रांनी त्याला तत्काळ सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.