लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख अनिल बाबुलाल सूर्यवंशी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचेकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. पाचोरा येथील प्रो. डॉ. जिजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनात हिंदी विषया अंतर्गत “ज्ञानप्रकाश विवेक की ग़ज़लों का चिंतनपरक अनुशीलन” या विषयावर त्यांनी पीएच.डी.चा संशोधन प्रबंध सादर केला. या पीएच.डी. संशोधन कार्यासाठी कला शाखेचे माजी आधिष्ठाता प्रा.डॉ. मधु खराटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
अनिल बाबुलाल सूर्यवंशी यांना शिक्षण क्षेत्रातली पीएच.डी. ही उच्च पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष एड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा श्रीमती. आशाताई पाटील, सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील, सहसचिव व प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, कार्यकारी मंडळ सदस्य, उपप्राचार्य प्रो.डॉ.ए. एल.चौधरी, डॉ. व्हि.टी.पाटील, प्रा. एन. एस. कोल्हे, डॉ. के.एन. सोनवणे, प्राध्यापक, शिक्षकेत्तर बंधु-भगिनी यांनी हार्दिक अभिनंदन केले.