पारोळा : प्रतिनिधी
येथील न्यायालयाने विनयभंग करणाऱ्या गुन्हेगारास एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. हा गुन्हा २०१७मध्ये झाला होता,
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी भिला चव्हाण (३८, दळवेल तांडा) याने एका महिलेचा विनयभंग केला होता. त्या गुन्ह्याची सुनावणी न्यायमूर्ती एम. एस. काझी यांच्यासमोर पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. पी. बी. मगर यांनी युक्तिवाद केला, गुन्ह्याचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण शिंदे यांनी केला होता.