Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष देत होता एक लाखाला तीन लाख रुपये !
    क्राईम

    ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष देत होता एक लाखाला तीन लाख रुपये !

    editor deskBy editor deskJanuary 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : वृत्तसंस्था

    गेल्या काही महिन्यापासून राज्यातील ठाकरे गट अनेक अडचणीत असतांना पुन्हा एकदा ठाकरे गटाचे तालुकाध्यक्षाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुकाध्यक्षाच्या पराक्रमामुळे कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या अस्मितेला धक्का लागला आहे. एक लाखाला तीन लाख रुपये बनवून नोटा छापून देण्याचा प्रकार तालुकाध्यक्षांने सुरू केला होता. या प्रकरणी पाेलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीचा सूत्रधार अशोक बापू पाटील (वय ५१, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) हा आहे. त्याच्यासह मेहरूम अल्ताफ सरकवास (वय ४१) आणि सलील रफिक सय्यद (वय ३०, दोघे रा. घटप्रभा, जि. बेळगाव, कर्नाटक) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाखाची रोकड आणि नोटा छपाईचे साहित्य असा दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या तिघांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

    संशयित अशोक पाटील हा कर्जबाजारी आणि आर्थिक गरजवंतांना हेरुन कर्नाटकातील साथीदारांच्या मदतीने तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली हाेती. पोलीस अधीक्षक पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले हाेते. अशोक पाटील हा शिवसेना ठाकरे गटाचा कागल तालुका अध्यक्ष आहे अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. मेहरूम सरकवास महिला असल्याचे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.