


मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन अनेक प्लान आखीत कारवाई करीत आहे. पण सध्या पोलीस सामान्य जनतेचे रक्षण करण्याचे काम करतात. मात्र, हेच पोलीस जर भक्षक बनले तर? अशीच एक धक्कादायक घटना मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून पुढे आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलिस अधीक्षक अनेक दिवसांपासून त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे.
या महिला पोलिसांनी केलेल्या आरोपांवर खळबळ माजली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार या संबंधातून या महिला शिपाई गर्भवती राहिल्याने त्यांना जबरदस्तीने गर्भपात देखील करायला भाग पाडण्यात आलं. यासोबतच या अधिकाऱ्यांनी शरीरसंबंध ठेवतानाच व्हिडिओ देखील काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रार अर्जात केला आहे.


