Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चार वर्ष फुकट खाली बिर्याणी : पोलिसांनी उतरविली मस्ती !
    क्राईम

    चार वर्ष फुकट खाली बिर्याणी : पोलिसांनी उतरविली मस्ती !

    editor deskBy editor deskJanuary 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : वृत्तसंस्था

    ‘पैसे काय मागतोस, मी कोण आहे तुला माहिती नाही काय?’ असे धमकावत चार वर्ष फुकट बिर्याणी खाणाऱ्या गुंडाला शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री ताराराणी चौक परिसरातून अटक केली. आकाश आनंद भोसले (३०, रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. फेरीवाले आणि व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मोहीम या कारवाईने सुरू झाली.

    गेल्या चार वर्षांपासून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दमदाटी करून आकाश भोसले हा त्यांच्याकडून फुकट खाद्यपदार्थ उकळत होता. याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास व्यवसाय करू देणार नाही, असेही तो धमकावत होता. पोलिसांनी शनिवारी फेरीवाले आणि व्यावसायिकांची बैठक घेऊन गुंडांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले. त्यानुसार काही व्यावसायिकांनी आकाश भोसले या गुंडाबद्दल तक्रार दिली. पोलिसांनी शनिवारी रात्री या गुंडाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बिर्याणी सेंटरवरून अनेकदा फुकट बिर्याणी आणि मासे घेतल्याची कबुली दिली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांच्याच नावाची आमची मागणी; बच्चू कडूंची भूमिका वैयक्तिक – उदय सामंत

    June 8, 2026

    लघुशंकेच्या वादातून तरुणाचा खून; फरार प्रियकर-प्रेयसी मध्यप्रदेशातून जेरबंद

    June 8, 2026

    जामनेर-बोदवड मार्गावर भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू, १३ जण जखमी

    June 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.