• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

साडेचार वर्षीय चिमुकलीचे अपहरण : १२ तासात पोलिसांनी काढले शोधून !

editor desk by editor desk
January 6, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
साडेचार वर्षीय चिमुकलीचे अपहरण : १२ तासात पोलिसांनी काढले शोधून !

अकोला : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरातून अनेक अल्पवयीन मुलीचे अपहरण होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच अकोला शहरातील महाकाली कॉलनीमध्ये एका साडे चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी बारा तासांच्या आत चिमुकलीचा शोध घेत अपहरणकर्त्या महिलेला अटक केली आहे.

मिलेल्ल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनीमध्ये राहणारे मालाकार कुटुंब कामानिमित्त अकोल्यात आले होते. दि.५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास त्यांची साडेचार वर्षांची गुड्डी ही खेळत खेळत टिळक मारुती मंदिराकडे गेली. त्याच वेळी एक लाल साडी घातलेली महिला त्या ठिकाणी आली व लहान मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवत तिला सोबत घेऊन गेली. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आई वडिलांच्या संपूर्ण परिसरात शोध घेतला परंतु मुलगी कुठेही आढळून न आल्याने अखेर त्यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली.

सदरचे घटनेचे गांभीर्य राखत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी तपासाची यंत्रणा कामी लावली व बारा तासाच्या आत अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेतला. आज (शनिवार, ६ जानेवारी) दुपारच्या सुमारास रामदास पेठ पोलिसांनी अकोट फाईल भागातील बापू नगरमध्ये सदर महिलेच्या घरी शोध मोहीम राबविली. त्या ठिकाणी अपहरण झालेली मुलगी ही सुरक्षित रित्या आढळून आली, रामदास पेठ पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतली असून आज दुपारी तिला न्यायालयात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous Post

जि.प.सदस्य प्रतापराव पाटील साई चरणी !

Next Post

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद !

Next Post

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

जीवनात काही प्रकारच्या बदलाबद्दल विचार करणार !

July 1, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group