Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपच्या आमदाराची दादागिरी : थेट पोलिसाच्या लगावली कानशिलात !
    क्राईम

    भाजपच्या आमदाराची दादागिरी : थेट पोलिसाच्या लगावली कानशिलात !

    editor deskBy editor deskJanuary 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदाराच्या चांगलचं अंगलट आलं आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

    बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
    भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ समोर येताच विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं होतं. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात उचलण्याची हिंम्मत होतीच कशी, असा सवाल विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

    गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर पुणे पोलिसांनी आमदार कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जमाफीची मोठी घोषणा, पण शेतकरी नाराज; सरकारच्या निर्णयावर टीकेची झोड

    March 6, 2026

    अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंत कर्जमाफी आणि बरेच काही !

    March 6, 2026

    मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट इशारा

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.