Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात २३ वर्षीय तरुणाने संपविले जीवन !
    क्राईम

    जळगावात २३ वर्षीय तरुणाने संपविले जीवन !

    editor deskBy editor deskJanuary 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मध्यप्रदेशातून जळगावात एमबीएचे शिक्षणासाठी आलेल्या सौरभ विकास कोल्हे (वय २३, मूळ रा. दाभियाखेडा, मध्यप्रदेश, ह.मु. गंधर्व कॉलनी) या तरुणाने मित्रांसोबत राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील दाभियाखेडा येथील रहिवासी असलेला सौरभ कोल्हे याने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पुर्ण केले होते. त्यानंतर तो एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी मध्यप्रदेशातून जळगावात आला होता. जळगावातील गंधर्व कॉलनीमध्ये एका भाडेतत्वावरील खोलीमध्ये राहून एमबीएच्या शिक्षणासाठी तयारी करत होता. गुरुवारी संध्याकाळी सर्व मित्र खोलीबाहेर बसलेले असताना सौरभ खोलीत गेला. त्याने मागील खोलीमध्ये जावून गळफास घेतला. रात्री साडेनऊ वाजता त्याचे मित्र जेवणासाठी बोलवण्यासाठी गेले असता, त्यांना सौरभ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्या वेळी त्यांना मोठा धक्का बसला. या विषयी त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना व पोलिसांना माहिती दिली.

    घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सौरभला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत सौरभव याला मयत घोषित केले. या दरम्यान आसोदा येथे राहत असलेले सौरभचे मामादेखील तेथे पोहचले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एलपीजी, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक !

    March 28, 2026

    मुख्यमंत्री महाराष्ट्राला मूर्ख समजत आहेत का? सरोदेंचा गंभीर आरोप !

    March 28, 2026

    ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : ऋषीकेश वैद्यला अटक

    March 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.