जामनेर : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय मुलीचा शेतात मजुरी करीत असतांना एकाने विनयभंग केला तर समजविण्यासाठी गेली असता दुसऱ्याने तिला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी जामनेर पोलिसात दोघाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी शेतात मजुरीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. दि.१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील एका शेतात तरुणी मजुरी करीत असतांना या ठिकाणी संशयित आरोपीने तरुणीच्या पाठीमागे दगड मारून व एकटक पाहून तुझा मोबाईल नंबर दे असे म्हणून मनास लज्जा उत्त्पन्न होईल असे कृत्य केले त्यानंतर दि.४ रोजी हि तरुणी संशयित आरोपीला समजविण्यासाठी गेली असता दुसऱ्या संशयित आरोपीने तरुणीला शिवीगाळ करीत काठीने मारहाण देखील केली तुम्हाला पाहून घेवू अशी धमकी देखील दिली याप्रकरणी तरुणीने जामनेर पोलिसात धाव घेत दोन्ही संशयित आरोपी विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे हे करीत आहेत.