नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीच्या घटना समोर येत असतांना नुकतेच राजस्थानच्या केमिकल कंपनीला अतिरिक्त डेटोनेटर्स बनविण्याची परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच घेणाऱ्या ‘पेसो’च्या (पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नागपुरात रंगेहाथ पकडले. लाच देणारा कंपनीचा संचालक व एक बाहेरील व्यक्तीदेखील जाळ्यात अडकली आहे.
‘पेसो’चे मुख्यालय नागपुरात आहे. चित्तोडगड जिल्ह्यातील सुपर शिवशक्ती केमिकल्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक देविसिंग कच्छवाह यांच्याकडे दोन अधिकाऱ्यांनी झेरॉक्स दुकानाचा मालक प्रियदर्शन दिनकर देशपांडे (रा. लेक व्ह्यू अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) याच्या मार्फत १० लाखाची लाच मागितली होती. देशपांडेच्या दुकानातच पैसे घेताना आरोपींना पकडण्यात आले.