Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकीचा अपघात : मानेची नस कापताच तरुणाचा जागीच मृत्यू !
    क्राईम

    दुचाकीचा अपघात : मानेची नस कापताच तरुणाचा जागीच मृत्यू !

    editor deskBy editor deskJanuary 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या नियमित घटना सुरु असतांना नुकतेच वावडदे ते विटनेरदरम्यान जळके गावाजवळ एक दुचाकी घसरल्याने एक मोठा अनर्थ घडला आहे. यात एका १६ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील विटनेर येथील रहिवासी चेतन दीपक वराडे (वय १६) हा पुष्पल राजाराम गायकवाड (वय २०) यांच्या सोबत दि.३ जानेवारी रोजी लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने चेतन याच्या मानेची नस कापली जाऊन चेतनचा जागीच मृत्यू झाला. तर पुष्पल हा तरुण जखमी झाला, विटनेरचा रहिवासी असलेला चेतन वराडे हा इयत्ता दहावीला असून, तो व पुष्पल गायकवाड हे दोघे जण बुधवारी दुचाकीने लग्नाला गेले होते. लग्नाहून परतत असताना वावडदे ते विटनेरदरम्यान जळके गावाजवळ दुचाकी घसरली. अपघातानंतर मयत व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले.

    मयत चेतनचे आई-वडील मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याचा मोठा भाऊदेखील आई- वडिलांना कामात मदत करतो. चेतन शिक्षण घेत होता. अधून-मधून तोदेखील काम करून कुटुंबाला हातभार लावत होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.