जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय महिलेला अश्लील बोलून विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.१३ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका संशयित आरोपी महिलेच्या घराजवळील ओट्यावर येवून महिलेस पैश्याचे आमिष देत चुकीचे कृत्य कर असा दम दिला व शिवीगाळ करीत महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सचिन पाटील हे करीत आहेत.