लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तत्कालीन माजी कुलगुरू पी पी पाटील यांनी विद्यापिठाचा भोंगळ कारभारामुळे व ठेकेदार यांच्या दबावाला बळी पडून अचानक राजीनामा दिला होता.
तसेच लगेच संशोधन चोरी प्रकरणात असलेले माजी प्र कुलगुरू माहुलीकर सरांनी राजिनामा दिला. त्यानंतर लगेचच परीक्षा नियंत्रक बी बी पाटील व भटू प्रसाद पाटील यानी राजीनामा देऊन नाशिक ला गेले. तसेच FAO यांनी गोहील यानी आरोप करून राजीनामा दिला.
तसेच प्रभारी कुलसचिव म्हणून अँड भादलीकर यांची नियुक्ती झाली होती त्यांनी देखील लगेच राजीनामा दिला . व नवीन परीक्षा नियंत्रक प्रो के एफ पवार हे आताच नियुक्त झाले होते त्यांनी आज राजीनामा दिला .ही खेदजनक बाब आहे.
विद्यापीठात कोणाच्या दबावामुळे हे राजीनामा सत्र सुरू आहे .विद्यापीठात किती मोठा भ्रष्टचार आहे, की त्या ऑनलाईन परीक्षा प्रकरणाचा गोंधळ, सुरक्षा रक्षक, दैनिक कामगार, सफाई कामगार ठेका या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू होणार व बिले काढण्यासाठी केलेले बेकायदेशीर एका व्यक्तीच्या नावाने केलेले ठराव आता त्यांची होणारी चौकशी हे राजीनामा देण्यामागे कारण आहे की काय अजून काही वेगळी करणे आहेत व हे राजीनामा सत्र का सुरू आहे.
या संपूर्ण गोष्टीचा खुलासा प्रभारी कुलगुरू महोदयांनी करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे माजी जिल्हा अध्यक्ष अँड कुणाल पवार,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव भूषण भदाणे यांनी केली आहे.
यामुळे आपल्या विद्यापीठच नाव खराब होत आहे त्यामुळे आपली बदनामी कधी थांबेल व ह्याला कोण जबाबदार आता कोणाला जबाबदार धरून त्याच्या विरुध्द न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार याचा खुलासा करावा असे अँड कुणाल पवार यांनी सांगितले आहे.