जळगाव : प्रतिनिधी
भरधाव वेगावे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी मानराज पार्क परिसरातील चौफुलीजवळ घडली, या अपघातात पूनम प्रभाकर जाधव (वय ३८, रा. खोटेनगर) या दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोटे नगर परिसरात पूनम जाधव या वास्तव्यास असून रविवारी त्यांच्या (एमएच १९, डीव्ही १५२७) क्रमांकाच्या दुचाकीने वाघनगर येथे जात होत्या, मानराज पार्क चौफुलीजवळ आलेल्या असताना दुचाकीला भरधाव ट्रकने (एमएच १८, एए ६६५५) धडक दिली. यात दुचाकीस्वार महिलेचा पाय फॅवर होण्यासह दोन्ही हातांना व डोक्याला मार लागला, या प्रकरणी पूनम जाधव यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संदीप पाटील करीत आहेत.