लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: विज्ञान व तंत्रज्ञान विभागा अंतर्गत औषधनिर्माण क्षेत्रातल्या संशोधनात केल्या बद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी. एच. डी.) प्रदान केली. संशोधन क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल “यंग सायंटिस्ट ऑफ इंडिया” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रा. हर्षल लिलाधर तारे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागा अंतर्गत औषधनिर्माण क्षेत्रातल्या संशोधनात “प्रीक्लीनिकल इव्हॅल्युएशन ऑफ अँटीव्हेनोम पोटेंशिअल ऑफ सिलेक्टेड मेडिसिनल प्लांट्स फ्रॉम वेस्टर्न घाट्स ऑफ इंडीया” या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला.
त्यांनी केलेल्या संशोधन बद्दल डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी. एच. डी.) प्रदान करण्यात आली.
साडेसात वर्षांच्या पी. एच. डी. संशोधन कार्यकाळात त्यांनी २३ पुस्तके, १२ शोधनिबंध आणि २ पेटंट्स प्रकाशित केले. त्यांच्या संघाने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केलेल्या सादरीकरणात १० पारितोषिके मिळवली. विशेषतः आफ्रिका खंडातील अनेक देशांमधून त्यांच्या संशोधनाला उत्तम प्रतिक्रिया मिळाल्या.
न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी तसेच हार्वर्ड मेडिकल स्कूल; अमेरिका, एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी; पुणे, जेएनटीयू हैदराबाद युनिव्हर्सिटी; तेलंगणा, आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ; नांदेड, येथून प्रबंधाचे परीक्षण करण्यात आले. औषधनिर्माण क्षेत्रात केलेल्या सखोल संशोधनाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, पी.एच.डी. गाईड के.जे. एज्युकेशनल इन्स्टिट्युट ट्रिनिटी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी, संशोधन केंद्र अमृतवाहिनी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. जे. चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले आणि एमजीएम युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथील व्यवस्थापन क्षेत्रातील पुढील संशोधनास शुभेच्छा दिल्या.