Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदिवसा जळगावात पसरवत होता गुप्तीने दहशत !
    क्राईम

    भरदिवसा जळगावात पसरवत होता गुप्तीने दहशत !

    editor deskBy editor deskJanuary 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या मयूर प्रशांत पाटील (२१, रा. इदगाव ता. जळगाव) याला शहर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, १ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली.तरुणाकडून लोखंडी गुप्ती हस्तगत केली असून, या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात एक तरुण हातात लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळ कारवाई करत मयूर पाटील याला ताब्यात घेत त्याच्याजवळून लोखंडी गुप्ती हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोकों रतन गिते यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मयूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोहेकों प्रफुल्ल धांडे, पोलिस नाईक किशोर निकुंभ, पोकों तेजस मराठे, अमोल ठाकूर, रतन गिते आदींनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी मंत्री खडसे अडचणीत येणार ? सरकारने दिले एसआयटी चौकशीचे आदेश !

    March 11, 2026

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.