नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागत होत असतांना एक धक्कादायक बातमी जपानमधून समोर आली आहे. जपानमधील एका प्रांतात नेहमीच भूकंपाचे हादरे जाणवत असतात. आज देखील जपानमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. हा भूकंप तब्बल ७.४ रिश्टर स्केलचा होता. भूकंपानंतर समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरांना त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. भूकंपाच्या रिश्टर स्केलचे प्रमाण जास्त असल्याने यात नागरिकांच्या घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसान झालेल्या ठिकानचे काही व्हिडीओ देखील समोर आलेत. नोटो द्वीपकल्पात शेजारील शहरांत भूकंप झाल्यानंतर असलेल्या परिस्थितीचा व्हिडीओ तेथील स्थानीकांनी सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाल्याचे दिसत आहे. भूकंपामुळे येथील अनेक इमारतींना तढे गेलेत. यातील सुपरस्टोअरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दुकानातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय.