Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्यासह मुलाला बेदम मारहाण !
    क्राईम

    जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्यासह मुलाला बेदम मारहाण !

    editor deskBy editor deskJanuary 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील कल्याणे होळ येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्यासह मुलाला लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथे सरिता मनोज कापडणे (वय-३१) या महिला पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता शेजारी राहणारे भाईदास जगन कापडणे यांच्याशी वाद झाला. याच रागातून भाईदास कापडणे, छोटू जगन कापडणे, सिमाबाई, पौर्णिमा, सुनंदाबाई, मिलींद, जगन खंडू कापडणे, आणि कलाबाई (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. कल्याणे होळयांनी सरिता कापडणे यांच्यासह त्यांचे पती आणि मुलगा यांना लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर दाम्पत्याला जळगाव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शनिवारी रात्री ८ वाजता सरिता कापडणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणारे आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक पाटील हे करीत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल; धरणगाव पोलीस निरीक्षकपदी उमाकांत गायकवाड

    June 16, 2026

    शांतता करारानंतरही दिलासा नाही : सीएनजी-पीएनजी दरवाढीचा दणका !

    June 16, 2026

    ‘ऑपरेशन क्लीन-अप’ : जळगाव शहरात पहाटेपासून पोलिसांचा धडक अॅक्शन

    June 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.