प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : धरणगाव तालुक्यातील २३ गावांतील ५० महिलांना वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प द्वारे “उपजिविकेसाठी सशक्तीकरण” योजनेअंतर्गत
शिलाई मशीनचे वितरण धरणगाव येथे करण्यात आले.
महिलांना आधुनिक शिलाई व्दारे शिवणकामा मुळे रोजगार उपलब्ध व्हावा .त्यांचे सशक्तीकरन करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प द्वारे शिलाई मशीन – पिको, फॉल, एम्ब्रोयडरी, बटन लावणे, रफू करणे, लाईट ई. आणि आधुनिक सोई सुविधा युक्त असे इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.आधुनिक मशीन असल्यामुळे त्याचे प्रशिक्षण आवश्यक होते. प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई हून कंपनीचे वरिष्ठ टेक्निशियन दिलीप शिरके आणि धुळे हून धीरज बाफना कार्यक्रमाला उपस्थित होते.
दिवसभराचे प्रशिक्षण त्यांनी लाभार्थ्यांना दिले.
या कार्यक्रमाला तहसीलदार नितीन कुमार देवरे हे अध्यक्ष म्हणून लाभले तर लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे प्रकल्प अधिकारी अनिल बल्लुरकर यांनी लाभार्थ्यांना संस्थेविषयी माहिती दिली. तहसीलदार नितीन कुमार देवरे आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना महिलांना सशक्तीकरना विषयी अनमोल मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपल्या भाषणात वर्ल्ड व्हिजन इंडिया करीत असलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करीत वर्ल्ड व्हिजन इंडिया ला शुभेछा दिल्या.विजय राऊत संस्थेचे कार्यक्रम संयोजक यांनी सूत्र संचालन केले. वर्ल्ड व्हिजन इंडिया चे सर्व कर्मचारी आणि लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.