मुंबई : वृत्तसंस्था
सरत्या वर्षातील आज शेवटचा दिवस असून उद्यापासून नवं वर्ष सुरू होत असल्याने राज्यातील अनेक ठिकठिकाणी नव वर्षाचं स्वागत केलं जात आहे. अशातच या नव वर्षांच्या या पार्ट्यांमध्ये काही ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. ठाण्यातील रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांकडून मोठी कारवाई केली गेली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई केली आहे. ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव पार्टी करत असताना 100 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्त रित्या कारवाई करण्यात आली आहे.
नव वर्षाच्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाही केली आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कासार वडवली गावात या रेव्ह पार्टीचं रात्री आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीवर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्राईम ब्रँच 5 च्या टीमने छापा टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत 95 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यात 5 मुलींचा ही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. रेव्ह पार्टीत पकडलेल्या सर्व आरोपीचे मेडिकल चेकअप करून, ठाणे कासारवडवली पोलीस ठाणे आणि क्राईम ब्रँच 5 च्या कार्यालयात नेण्यात येणार आहे.
ठाण्यात सुरु असलेल्या या रेव्ह पार्टीत ड्रग्स, एल एस डी, गांजा, चरस, दारू या अमलीपदार्थांचं सेवन केलं जात होतं. डीजेच्या तालावर नशेबाज तरुण थिरकत होती. क्राईम ब्रँचच्या टीमला याची माहिती मिळाली. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांचं आज सकाळी ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात आणलं गेलं. त्याचं मेडिकल चेकअपही करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद पार्टीमध्ये सामील झाले होते. चरस ,गांजा, अल्कोहोल, एमडी अशा विविध नशा करण्यासाठी अमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आलं होतं. तसंच कासारवडवली लगत रेव्ह पार्टीच्या ठिकाणावरून 25 मोटरसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. याबाबत आज ठाणे गुन्हे शाखा पोलीस पत्रकार परिषद घेणार आहे