धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वराड येथील लक्ष्मण माणिक वाडले (वय ५०) हे दि.२९ शुक्रवारी नऊ वाजता टँकर (एम.एच. १९ सीवाय ४३८८) भरण्यासाठी मनमाड येथे गेले होते तेथून जळगावकडे जात असताना रात्री दोन वाजता वराड गावाजवळच असलेल्या पुलाच्या भिंतीला टँकर धडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आऊट साईडने आलेल्या एका गाडीने टँकरला कट मारल्यामुळे टँकर पुलाच्या भिंतीवर धडकल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. वराड स्टॉपवर पुलाच्या भिंतीला टँकर धडकल्यामुळे लक्ष्मण वाडले यांना मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. हा अपघात पाहून गावकऱ्यांसह रामजी ऑइल मिलच्या कामगारांनी टँकरजवळ धाव घेवून लक्ष्मण वाडले यांना तात्काळ गाडीतून बाहेर काढले आणि खाजगी गाडीने जळगाव येथे हलविले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अपघातस्थळी शिवाजी खंडू पाटील कल्याण पाटील, रवींद्र महादू राजपूत, आनंद जुलाल सोनवणे, विनोद दिनकर जोशी यांनी मदत कार्य केले. घटनास्थळावर पाळधी पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत पाटील, हवालदार चौधरी यांनी पंचनामा केला.
लक्ष्मण वाढले हे अतिषय मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचे अपघातील निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. त्यांच्या मृतदेहावर आज रविवारी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, मोठा भाऊ असा परिवार आहे. ते पोलीस पाटील राजू वाडले यांचे चुलत भाऊ होते.