Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरात भीषण अपघात : महाविद्यालयाजवळ एकाचा जागीच मृत्यू !
    अमळनेर

    अमळनेरात भीषण अपघात : महाविद्यालयाजवळ एकाचा जागीच मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    शहरातील मारवड रस्त्यावर प्रताप महाविद्यालयाजवळ दि. ३० रोजी दुपारी १ च्या सुमारास एसटी व दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना  घडली. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील पिंपळे रोड भागातील वामन नगरातील रहिवासी प्रीतम गजमल शिंदे (४९) हे ३० रोजी नेहमीप्रमाणे दुचाकीने शेतीच्या कामानिमित्त बोरगाव येथे जाण्यास निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास धार रस्त्यावरील क्रीडा संकुलाजवळ अमळनेर-तांदळी एसटी बसची (क्रमांक एमएच ४०-एन ९०८२) धडक बसल्याने डोक्यास, तोंडास मार लागला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुकुंदा शिंदे यांच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026

    धरणगाव तालुक्यात क्रूझर उलटून नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    April 29, 2026

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.