जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बेळी गावातील झेंडू जी महाराज संस्थान मध्ये सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थांमधील गोशाळेची पाहणी करून गोमातेची पूजन केले तसेच कुंडलेश्वर महादेव मंदिरात पूजा करून संस्थांना व मंदिराच्या विकासासाठी शासन स्तरावर निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी उपस्थित त्यांना दिले.
झेंडूजी महाराज संस्थान बेळी येथे शनिवारी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. झेंडू जी महाराज संस्थान मध्ये हरिनाम सप्ताह सुरू असून याप्रसंगी पालकमंत्री यांनी भक्तगणाशी संवाद साधून संस्थांमधील गोशाळा याची पाहणी केली.
तसेच गोमातेचे पूजन करून क वर्गात असलेली ही गोशाळा ब व वर्गात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच कुंडलेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेत महादेवाची पूजा तसेच झेंडूची महाराजांच्या गादीचे दर्शन घेतले. यावेळी झेंडूची महाराज संस्थानचे भरत महाराज बेळी गावचे लोकनियुक्त सरपंच तुषार महाजन, मा. जि प उपाध्यक्ष लालचंद पाटील, चेतन भोळे, नशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील, विकास धनगर, दुर्गादास भोळे, पिंटू शेठ आधी परिसरातील महिला व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.