जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील बेळी गावातील सदगुरु झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानातील भगवान श्री कुंडलेश्वर गोशाळेत आज पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.राजूमामा भोळे यांनी भेट देत गोशाळेची पाहणी करीत दर्शन देखील घेतले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी प.पु.भरत महाराज बेळीकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
याठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ.राजूमामा भोळे यांच्या संयुक्त विद्यमाने ६० लाख रुपयांचा निधी सभामंडपासाठी तर सरक्षण भिंतीसाठी ४० लाख, पेव्हर ब्लॉकसाठी ३० लाख तर पुलासाठी ३० लाखांचा निधी देण्यात आला आहे.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, सदगुरु झेंडूजी महाराज बेळीकर यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून भविष्यात ब दर्जाचे तीर्थक्षेत्र मिळवून देण्यास प्रयत्न करणार तर यापुढे भरघोस निधी मिळवून देत संस्थानचा मोठा विकास करून जिल्ह्यातील भाविकांना सदगुरु झेंडूजी महाराज यांचे दर्शन घेण्याचा योग मिळवून देणार, यावेळी पालकमंत्री पाटील यांनी आ.राजूमामा भोळे यांचे देखील कौतुक केले. यावेळी माजी जी.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, बेळी गावाचे लोकनियुक्त सरपंच तुषार चौधरी, उद्योजक पिंटूशेठ, चेतन बर्हाटे, दुर्गादास भोळे, यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.