कोल्हापूर : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विधवा महिलावर अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतांना एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका विधवा महिलेने शरीर संबंधास नकार दिल्याने त्या महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेह उसाच्या फडात पेटवून दिल्याची घटना कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेची हत्या झाल्याची ही घटना घडली आहे. विधवा महिला हत्या प्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला आजरा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेच्या पतीचे निधन झालं आहे. ती आईसोबत भादवन येथे राहते. भादवन ते भादवनवाडी रस्त्यावरील शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात योगेश याने या महिलेला ओढत नेले. त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आशाताईने जोरदार विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या योगेशने तिची गळा आवळून हत्या केला. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून उसाच्या फडाला आग लावली. आग आटोक्यात आणण्याण्यासाठी योगेशचा आटापिटा सुरु होता. उसाच्या फडातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्याचाच पुढाकार होता. त्यामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला नाही. या प्रकरणात गावातील कॉन्स्टेबल समीर संभाजी कांबळे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.