नाशिक : वृत्तसंस्था
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या जेएन.१ व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केली असून राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत चाललीये. अशात नाशिकमध्ये २ नवीन रुग्ण सापडलेत. नाशिकच्या सिन्नरमध्ये पुन्हा दोन महिला कोरोना बाधित आढळ्या आहेत. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चाललीये
गेल्या ३ दिवसांपूर्वी सिन्नरमध्ये २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता पुन्हा २ रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या ४ वर पोहचली आहे. कोरोनाची लक्षणं दिसल्यास तातडीनं कोरोना चाचणी करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. अमरावतीमध्ये देखील पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. पाच नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे. 52 संशयित रुग्णांचे सँपल संत गाडगे बाबा विद्यापीठ प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठवण्यात आले होते. त्यापैकी पाच रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आलाय.
यातील दोन रुग्ण अमरावती शहरातले आहेत तर तीन रुग्ण हे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी माक्स आणि कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोनाची रुग्ण संख्या ८ वर पोहचली आहे. महानगरपालिकेकडून मागील दहा दिवसात ९५५ चाचण्या करण्यात आल्यात. छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोणाच्या रुग्ण संख्येत वाढ होत चाललीय. शहरात आठ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाअसून हे आठही रुग्ण होम आय सोलेशनमध्ये असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागान दिलीय.