Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भीषण अपघात : डंपरने ८ वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले !
    क्राईम

    भीषण अपघात : डंपरने ८ वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले !

    editor deskBy editor deskDecember 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना पुणे शहरातून समोर आली आहे. पुण्यात मंतरवाडीमध्ये भीषण अपघात झाल्यांनतर डंपरने चिमुरड्याला चिरडले. यामध्ये त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. एक महिला तिच्या भाचा आणि भचिला दुचाकीवरुन घेवून शहरात येत असताना एका भरधाव डंपरने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 8 वर्षांचा चिमुकला खाली पडून डंपर खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे.

    दरम्यान, अपघातानंतर संतापलेल्या जमावाने डंपर पेटवून दिला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काही नागरिकांनी दगड फेक केल्याची माहितीही समोर आली आहे. शौर्य सागर आव्हाळे असे अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय बाबासाहेब भाडळे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी अक्षय भाडळे यांची बहीण तिचा भाचा शौर्य आणि भाची तृणल या दोघांना घेऊन दुचाकीवरून मंतरवाडी येथून घरी जात होत होती. यावेळी एच. पी. पेट्रोल पंपाजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगात डंपरचालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपरची दुचाकीला धडक बसली. यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली. दुचाकीवर पाठीमागे बसलेला 8 वर्षीय शौर्य हा डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर डंपरचालक मदत न करता पसार झाला. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे मंतरवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाल्मिक कराडसह आरोपींवर आरोप निश्चित; पुढील सुनावणी ८ जानेवारीला

    December 23, 2025

    जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जांना गर्दी

    December 23, 2025

    राष्ट्रवादी पुन्हा एकत्र?; महापालिकेसाठी दोन्ही गटांमध्ये सकारात्मक चर्चा

    December 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.