Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बहिण भावांवर चॉपरने हल्ला : पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात !
    क्राईम

    बहिण भावांवर चॉपरने हल्ला : पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात !

    editor deskBy editor deskDecember 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरापासून नजीक असलेल्या कुसुंबा या गावी शुल्लक कारणावरुन भाऊ आणि बहिण अशा दोघांवर चॉपरचा वापर करुन प्राणघातक हल्ला करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. कुसुंबा गावातील गणपती नगरात राहणारे करण चंद्रशेखर पाटील आणि चेतन वसंत माळी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर 2023 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कुसुंबा गावी असलेल्या हॉटेल शिवशाहीच्या मागे अजय सुरेश सोनवणे यांच्या राहत्या घरासमोर करण आणि चेतन हे दोघे विनाकारण आरडाओरड करत होते. त्यावेळी अजय सोनवणे यांनी त्यांना आरडाओरड करु नका असे म्हटले. अजयच्या बोलण्याचा राग आल्याने करण आणि चेतन या दोघांनी अजय सोनवणे यांच्या गळ्यावर चॉपरने वार करुन अश्लिल शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केला. अजयवर होत असलेला हल्ला बघून त्यांची बहिण सपना ही भांडण सोडवण्यासगेली. तिच्या कपाळावर देखील चॉपरने वार करुन तिला जखमी करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चंद्रशेखर पाटील आणि चेतन माळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ला करुन पलायन केलेल्या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसरातून ताब्यात घेत अटक केली.

    उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्यासह पो.नि. जयपाल हिरे, पो.नि. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, अल्ताफ पठाण, सचिन मुढे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, सुधीर साळवे, ललीत नारखेडे आदींनी दोघांना ताब्यात घेतले. न्या. श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील करण पाटील याच्यविरुद्ध यापुर्वी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचे पडसाद : जळगावात भाजपने काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा !

    February 15, 2026

    “शिवरायांच्या नावावर राजकारण थांबवा” : सपकाळांचा भाजपला थेट इशारा

    February 15, 2026

    गॅस सिलिंडरचा स्फोट : तीन परिवाराचा संसार जळून खाक !

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.