पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून अपघाताच्या घटना सुरु असतांना नुकतेच सोमवारी रात्री ११.३० एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने २ जण जागीच ठार झालेत. तर एक जण किरकोळ जखमी आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नगर महामार्गावर सोमवारी रात्री ११.३० वाजता बकोरी फाट्याजवळ हा अपघात झाला. रावसाहेब सिदाजी माने ( वय 21, रा. रामनगर, लोणीकंद ) व राहुल मोहन डुकले ( वय 19, रा. गोरे वस्ती, वाघोली ) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. रावसाहेब हा फूड डिलिव्हरी करण्याचे काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
फूड डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना राहुल मित्रासोबत दुचाकीवरुन निघाला. यावेळी दोघांच्याही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण जागेवरच ठार झाला. तर राहुलला रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर राहुलच्या मागे बसलेला तरुण किरकोळ जखमी झालाय. रावसाहेबच्या मागे आईवडील, विवाहित बहीण असा परिवार आहे.