Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्यरात्री गावात घुसली वाघीण : १२ तासाचा थरार !
    क्राईम

    मध्यरात्री गावात घुसली वाघीण : १२ तासाचा थरार !

    editor deskBy editor deskDecember 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    उत्तर प्रदेशच्या पिलिभित जिल्ह्यातील एका गावात रात्रीच्या वेळी घुसलेल्या वाघिणीला जवळपास १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात कैद करण्यात यश आले. वाघीण घुसल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघिणीला बेशुद्ध करत पकडले यावेळी या परिसरात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. वाघिणीला पकडतानाचा व्हिडीओ बनवून अनेकांनी तो सोशल माध्यमावर टाकला.

    व्याघ्र संरक्षित क्षेत्र माला रेंजपासून चार किमी दूर अंतरावर स्थित अटकोना गावात वाघिणीने घुसखोरी केली होती. गावातील शेतकरी सुखविंदर सिंग आपल्या कुटुंबासोबत सोमवारी रात्री झोपलेले होते. रात्री १२ च्या सुमारास घराजवळील वाहनावर वाघिणीने उडी मारत मोठी डरकाळी फोडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचा थरकाप उडाला. कुटुंबाने आरडाओरड करत संपूर्ण गावाला जागे केले. गावात वाघीण घुसल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळपर्यंत वाघीण घराच्या सुरक्षा भिंतीवर आरामात पहुडली होती. वनविभागाने वाघिणीला पकडण्यासाठी अभियान सुरू करत, तिला बेशुद्धीची जवळपास चार इंजेक्शन मारली. पहिले इंजेक्शन न लागल्याने ८ मिनिटांनी तिच्यावर दुसऱ्या इंजेक्शनचा मारा करण्यात आला.

    पण वाघिणीने लागलीच आपल्या तोंडाने ते इंजेक्शन काढून टाकले. यानंतर तिसरे इंजेक्शन तिला लागले नाही. अखेरीस चौथे इंजेक्शन लागल्यानंतर वाघीण बेशुद्ध होऊ लागली. यावेळी वन कर्मचाऱ्यांनी तिच्या तोंडावर कपडा टाकत तिला पकडले. सकाळी ११ च्या सुमारास वाघिणीला पिंजऱ्यात टाकण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. बचाव अभियानावेळी या परिसरात गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्या घेत मोठी गर्दी केली होती. सुदैवाने वाघिणीने कुणावरही हल्ला केला नाही; परंतु गत काही दिवसांमध्ये पिलिभित व्याघ्र संरक्षित क्षेत्रातून रहदारी भागात वाघांची घुसखोरी वाढल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात मार्चच्या शेवटी उष्णतेतून अवकाळी पावसाकडे – हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’ !

    March 26, 2026

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.