Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गांधी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू
    क्राईम

    गांधी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील गांधी मार्केटच्या वरच्या मजल्यावरून एकाने सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात ते जखमी झाले होते, दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

    या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील ज्ञानेश्‍वर वामन मिस्तरी (वय ४५) हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. गावातील अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळेत शिपाई म्हणून नोकरीला आहेत. सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी पत्नी लताबाई आणि मुलगा मयूर यांच्या सोबत दवाखान्यात जाण्यासाठी आला होता.

    दरम्यान शहरातील गांधी मार्केटजवळ राहणार्‍या आपल्या बहिण शोभाबाई राजाराम मिस्तरी यांच्याकडे आला होता. दरम्यान, आज सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्याने आपल्या बहिणीला आपण रूग्णालयात जात असल्याचे सांगून तो बाहेर गेला. मात्र दवाखान्यात न जाता त्याने गांधी मार्केटमध्ये वर चढून तिसर्‍या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर मिस्तरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी लताबाई, मयूर, प्रतिक, अभिषेक तीन मुले असा परीवार आहे. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.