मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असतांना जेएन.1 (JN.1) या नव्या सब व्हेरियंटने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकरने सावध पवित्रा घेत काळजी घेण्याचं आव्हान केलेय. दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी कॉरनटाइन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.
मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सध्या ते पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषध उपचार सुरु आहेत.
राज्यातील कोव्हिड चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून त्यानंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून येतंय. मागील चोवीस तासांमध्ये राज्यात 35 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकही रुग्ण घरी परतला नाही. राज्यात आजपर्यंत एकूण 80,23,418 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के एवढे झाले आहे. तर सद्या राज्यातील मृत्यूदर 1.81 टक्के इतका आहे.