मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून देशभरा मनोज जरांगे पाटलांचे नाव चर्चेत आले आहे. मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका मांडणारे अ्न वेळ प्रसंगी सरकारला झुकवणारे आंदोलक… ही ओळख त्यांनी निर्माण केली असून आज मात्र वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाले. मनोज जरांगे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात दिसले. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. मनोज जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळताना दिसले. बॉलिंग आणि बॅटिंग करताना जरांगे या व्हीडीओमध्ये दिसत आहेत. जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आरक्षणसाठी लढा आंदोलन सुरू असतानाच जरांगे आपली खेळाची आवड जपताना दिसत आहेत.
मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन लोकांशी संवाद साधला. यावेळी पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि पँटमध्येच जरांगे नेहमी दिसले. पण आज मात्र जरांगेंचा वेगळा लूक पाहायला मिळाला. त्यांनी स्पोर्टचं जॅकेट घातलेलं दिसलं. अंतरवली सराटीतील क्रिकेटच्या मैदानात जरांगे अगदी फॉर्ममध्ये दिसले. त्यांनी बॅटिंग केली आणि बॉलिंगही केली. तसंच धावत धावा देखील घेतल्या. जरांगे यांचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.