Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कॉंग्रेसला राज्यात मोठा धक्का : आमदाराची आमदारकी रद्द !
    क्राईम

    कॉंग्रेसला राज्यात मोठा धक्का : आमदाराची आमदारकी रद्द !

    editor deskBy editor deskDecember 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    राज्याच्या राजकारणातून कॉंग्रेसला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सुनील केदार यांना दुसरा धक्का बसला आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा शुक्रवारी २२ डिसेंबर निकाल लागला. या प्रकरणात कोर्टाने राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुनील केदार यांना २ वर्षांपेक्षा अधिक काळाची शिक्षा सुनावल्याने नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द होणार असल्याची चर्चा होती. याबाबत पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर निर्णय घेतला असून सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. एकीकडे आगामी निवडणूकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.