यावल : प्रतिनिधी
प्रेम विवाहाच्या वादातून तरुण आणि तरुणीच्या कुटुंबांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम विवाह करण्यासाठी मुलाकडे आलेल्या मुलीस भेटण्यासाठी तीचे कुटुंबिय आले होते. त्यांनी मुलाच्या कुटुंबासोबत वाद घातला. त्यातून दोन्ही गटात हाणामारी झाली. यात ३८ वर्षांच्या महिलेला दुखापत झाली. यात तरुणाचे कुटुंब हे मुळ यावल येथील आहे. तर तरुणीचे कुटुंब हे भुसावळ येथील आहे. तरुणीची आई तरुणीला भेटण्यासाठी उल्हासनगर येथून यावल येथे आली. मात्र आईला मुलीशी भेटू दिले नाही, त्यानंतर वाद झाला आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.
तर तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील सार्वजनिक ठिकाणी या कुटुंबातील सदस्यांना मारहाण आली. त्यावरून दोन्ही कुटुंबांतील १४ जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास हे.कॉ. राजेंद्र पवार करीत आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी वसीम तडवी करीत आहे.