Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संतापजनक : सातवीच्या मुलीने दिला बाळाला जन्म !
    क्राईम

    संतापजनक : सातवीच्या मुलीने दिला बाळाला जन्म !

    editor deskBy editor deskDecember 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने बाळाला जन्म दिला आहे. हि घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बाभळेश्वरच्या आश्रमशाळेत घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बाभळेश्वरच्या आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीचे दहावीत शिकणाऱ्या एका मुलाशी प्रेम संबंध जुडून त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि मुलगी गर्भवती झाली. ही माहिती घरातील मंडळींना समजल्यावर दोघांच्या कुटुंबीयांनी एकमताने त्यांचे लग्न लावून दिले.

    गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील एका रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला. दरम्यान डॉक्टरांना मुलीचे वय कमी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. नंतर पोलिसांनी चौकशी केली असता मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याचे समजले. त्यांचे जरी रीतसर लग्न झाले असले तरीही त्यांचा हा बालविवाह होता. आणि बालविवाहावर कायदशीर बंदी आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.